कृष्णेची पातळी 38 फुटांवर; कोयनेतून वाढीव विसर्गही स्थगित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. दरम्यान, आज हवामान विभागाकडून जिल्ह्यात रेड रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे सातार, कराडकरांना काहीच दिलासा मिळाला आहे. कोयना धरणातून १० हजार क्युसेकने वाढविण्यात येणारा विसर्गही स्थगित केल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी वाढीचा वेग कमी आला असून कोयनेतून ३२ हजार १०० क्युसेकने विसर्ग चालू आहे.

कोयना, वारणा धरणासह जिल्ह्यात धुवाधार पावसाने झोडपून काढले होते. शुक्रवारी सकाळीही जोरदार पाऊस झाल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी दुपारी १२ वाजेपर्यंत ३८ फुटांवर गेली होती. परिणामी कोयना नदीकाठच्या पाटणा,कराडकरांना तसेच कृष्णा नदीकाठच्या सांगलीकरांमध्ये पुराची धास्ती होती. पुराच्या भीतीने जिल्हा प्रशासनाकडून देखील विशेष दक्षता घेण्यात आली आहे.

तब्बल आठवडाभरानंतर सातारा, कराडकरांना सूर्याचे दर्शन झाल्यामुळे पूरस्थिती बिकट होण्याचा धोका काही प्रमाणात टळला आहे. कोयना धरणातून दि. २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजलेपासून सांडव्यावरील विसर्गात १० हजार क्युसेकने वाढ करून ४२ हजार १०० क्युसेक विसर्ग होणार होता. पण, पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानाची तीव्रता कमी झाल्यामुळे १० क्युसेकची वाढ स्थगित केली आहे. सद्यस्थितीत कोयना धरणाच्या सांडव्यावरून ३० हजार क्युसेक विसर्ग चालू आहे. धरण पायथा विद्युत गृहामधील २ हजार १०० क्युसेक विसर्गासह एकूण विसर्ग ३२ हजार १०० क्युसेकने विसर्ग चालू आहे.