सातारा प्रतिनिधी । संपूर्ण महाराष्ट्रात परतीचा पाऊस चालू झालेला आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये या पावसाने चांगलं धुमाकूळ घातलेला आहे. अशातच हवामान विभागाने नवीन माहिती दिलेली आहे. त्या माहितीनुसार हा परतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे.
उद्या देखील महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र, कोकण तसेच गोव्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे विदर्भातील बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील मेघगर्जनेसस मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामाना विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे.
या परतीच्या पावसाचा रब्बी हंगामातील गहू, हरभरा यांसारख्या पिकांना मात्र फायदा होणार आहे. या पावसामुळे गहू, हरभरा यांना चांगला ओलावा मिळणार आहे. आणि पिकांच्या वाढीसाठी फायदेशीर होणार आहे. 9 ते 18 ऑक्टोबर दरम्यान नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता जास्त असणार आहे.