सातारा प्रतिनिधी | वाई पोलिसांच्या पथकाने आज शुक्रवारी केलेल्या धडक कारवाईत दोन दुचाकी चोरट्याला अटक केली. तसेच त्याच्याकडून १ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी देखील जप्त केल्या.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांस त्यांच्या खास बातमीदारांमार्फत वाई पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा नोंद असलेला संशयित आरोपी हा बावधन नाका परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शहाणे यांनी त्यास ताब्यात घेण्याच्या सुचना वाई तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांना दिल्या. वाई तपास पथकाने बावधन नाका परिसरात सापळा रचुन एका संशयित इसमास वाहन (क्र एमएच ११ सीवाय ७८२७) हिच्यासह ताब्यात घेतले. तेव्हा संशयित इसमास त्याचे नाव विचारता त्याने त्याने सोन्या उर्फ प्रितम सुनिल शिंदे (रा. गंगापुरी ता. वाई जि. सातारा) असे सांगितले. तसेच सदरचे वाहन त्याने वाई मंडई येथुन चोरी केल्याची कबुली दिली.
तसेच त्याच्याकडे अधिकची विचारपूस केली असता त्याने दि. o७/o४/२०२४ रोजी सिव्हील हॉस्पीटल सातारा येथुन काळया रंगाची स्पेल्डर (क्र एमएच ११बीजे ०६१०) ही देखील चोरी केल्याची कबुली दिली. सदरबाबत सातारा शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं ३५७/ २०२४भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने सदरच्या २ मोटारसायकल त्याच्या ताब्यातुन जप्त करण्यात आल्या आहेत. असा एकुण ०१ लाख ४० हजार रुपये किमतीच्या ०२ मोटारसायकल त्याच्याकड्न हस्तगतकरण्यात आलेल्या आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण, सुधीर वाळुंज पो.ना राहुल भोईर, पो.शि प्रसाद दुद्स्कर, राम कोळी, हेमंत शिंदे, नितीन कदम, श्रावण राठोड, धिरज नेवसे, विशाल शिंदे यांच्या पथकाने केली आहे. पोलीस अधिक्षक श्री. समीर शेख व अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी वाई तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.