कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील 133 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लागली आहे. त्यामधील तब्बल 42 ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या, तर 24 ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 64 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक, तर 14 गावांत निवडणूक लागली आहे. या ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. दरम्यान, जिल्ह्यात दुपारपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नसून पोलीस दलातर्फे संवेदनशील मतदार केंद्रांवर बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक, भोसलेवाडी, बानुगडेवाडी, गोसावेवाडी, हेळगाव, कांबीरवाडी, पिंपरी, शेळकेवाडी, येणपे, येवती, सयापूर, टेंभू या १२ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत असून तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणूक महत्वाची मानली जात आहे. तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा मतदार संघ असलेल्या पाटण तालुक्यात देखील ग्रामपंचायत निवडणूक होत असल्याने येथील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने निर्माण झालेल्या 133 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली आहे. त्यातील तब्बल 42 ग्रामपंचायतींमध्ये पूर्णत: बिनविरोध, तर 24 ग्रामपंचायतीत अंशत: बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे या संबंधित ग्रामपंचायतींमध्ये पुढील मतदान प्रक्रिया होणार नाही.
सध्या सत्यता जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतींसाठी तसेच 14 गावांमध्ये सरपंच/ सद्स्य पदासाठी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. 78 ग्रामपंचायतीत 237 मतदान केंद्रावर ही प्रक्रिया पार पडत आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असून मतदानावर परिणाम होऊ नये, यासाठी मतदान केंद्रालगत भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत.