सडा दाढोलीतील वयोवृद्ध मतदारांकडून जनजागृती; पाटण तालुका प्रशासनाकडून सत्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाच्या वतीने ग्रामीण भागामध्ये मतदान जागृतीची मोहीम राबवली जात आहे दरम्यान पाटण तालुक्यामध्ये निवडणूक विभागाच्या वतीने सडा वाघोली येथील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या ठिकाणी जेष्ठ नागरिकांच्या वतीने मतदान जागृती करत सर्व मतदार बांधवांना मतदान करण्याचे आवाहन देखील करण्यात आले.

पाटण तालुक्यातील सडा दाढोली येथील वयोवद्ध पुरुष व महिलांचा यांच्यावतीने तरुण मतदार बांधवांना विधानसभा निवडणुकीमध्ये शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचीही माहिती मतदारांना देण्यात आली.

दरम्यान निवडणूक प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रभात फेरीमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या हातामध्ये “चला मतदान करुया, देशाची प्रगती घडवूया, बुढे हो या जवान चलो मिलकर करे मतदान, मतदान आपला अधिकार निवडू मनाजोगे सरकार, जागरुक मतदार लोकशाहीचा आधार अशा विविध आशयाचे महिलांनी बोर्ड घेऊन गावातून प्रभात फेरी काढली. आम्ही गावातील महिला विधानसभा निवडणुकीत 100 टकके मतदान करणार असल्याचीही ग्वाही देखील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने यावेळी देण्यात आली.