पुलाअभावी शिरळ गावच्या गावकऱ्यांचा दुथडी भरून वाहणाऱ्या ओढ्यातून जीव धोक्यात घालून प्रवास;पहा व्हिडिओ

0
129
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाळ्यात नदी नाले, ओढे दुथडी भरून वाहतात. अशातून जीव धोक्यात घालून आजही ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवास करावा लागतोय. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील शिरळ गावच्या ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून ओढा ओलांडतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. शेतात जाण्यासाठी या गावच्या शेतकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री याबाबत प्रशासनास माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाकडून दुसर्या मार्गे पुलावरून शेतकरी ग्रामस्थांना रस्ता सुरु करून देण्यात आला.

शिरळ गावातील शेतकरी, ग्रामस्थांना शेतात जाण्यासाठी मोहरी पूल नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. २०० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शिरळ गावातील नागरिकांची पुला अभावी मोठी गैरसोय होत असून अनेकल वर्षांपासून त्याच्याकडून धोकादायक रीतीने प्रवास करावा लागतोय. ओढ्यातून शेतात जाणारे अंतर हे कमी असल्या कारणामुळे ग्रामस्थ या मार्गे प्रवास करतात. मात्र, ज्यावेळी मुसळधार पाऊसपडतो त्यावेळी ओढ्याला देखील पाणी येते. पावसात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष की जात असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

गावातून शेतात तसेच शाळेत जाण्यासाठी पूल नसल्यामुळे अनेक दुर्गम अशा भागातील विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वाना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. वाहणाऱ्या ओढ्यातीळ पाण्यातून शाळकरी मुलं, रुग्ण, महिला हे सगळे धोका पत्करून रस्ता पार करताना दिसतात. गेल्या अनेक वर्षांपासून पूल बांधण्याची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे पण अजूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.