सातारा प्रतिनिधी । मोठ्या भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी सर्वत्र साजरी करण्यात आली. सातारा जिल्ह्यात माऊलींच्या परतीचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. माऊलीची पालखी पंढरपूरला दर्शन घेतल्यानंतर परती सुरु झाला. परतीच्या प्रवासामध्ये नीरा नदीवरती वारकऱ्यांमध्ये व विश्वस्तांमध्ये वाद निर्माण झाल्याची घटना आज नुकतीच घडली आहे. सुमारे अर्ध्या तासापूर्वी माऊलींच्या पादुकांचे रथाच्या मागील वारकऱ्यांना दर्शन न दिल्याने रथाच्या मागील वारकऱ्यांनी रथापुढे येऊन ठिया आंदोलन केले जात आहे. यावेळी माऊली माऊलीच्या जयघोषणात व टाळ वाजवत हे वारकरी गेली अर्धा तास बसून होते. सोहळ्याचे मालक व विश्वस्त याबाबत अरेरावेची भूमिका घेत वारकऱ्यांची समझोता न करता रथ तसाच पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत याला वारकऱ्यांकडून प्रखर विरोध करण्यात आला.
माऊलीच्या परतीच्या प्रवासात रथा पुढे २७ तर रथामागे ३५० दिंड्या असून गुरुवारी खंडाळा तालुक्यातील पाडेगावमधील मुक्काम आटपून आज सकाळी पावणे नऊ वाजता नीरा नदीच्या पवित्र तीर्थ माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. यानंतर माऊलींचा पालखी सोहळा मालकांकडून पादुका राथाकडे येत असताना प्रथे प्रमाणे रथाच्या पुढे दोन ओळी व रथाच्या मागे दोन ओळी वारकऱ्यांनी तयार केल्या होत्या. सोहळा मालकांनी पादुकांचे वारकऱ्यांना दर्शन दिले जाते.
यावेळी सोहळा मालकांनी रथाच्या पुढील दोन्ही ओळींना दोन्ही ओळीतील वारकऱ्यांना पादुकांचे स्पर्श दर्शन दिले. मात्र, माघारी फिरल्यानंतर रथाच्या मागील वारकरी विणेकरी व तुळशी घेतलेल्या महिलांना हे दर्शन देण्यात आले नाही. सोहळा मालकांनी या पादुका पुन्हा रथात ठेवल्याने रथामागील वारकऱ्यांचा हिरमोड झाला व त्यांनी लागलीच रथा पुढे येऊन ठिय्या आंदोलन केले. माऊली माऊलीचा जयघोष करत सुमारे तासभर माऊलींचा रथ अडवून धरला. यानंतर सोहळ प्रमुख वह सोहळा मालक व आळंदी विश्वस्त यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र वारकरी आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले यादरम्यान मोठा गोंधळ उडाला आहे. माऊलींचा रथ तासाभरानंतर मागील वारकऱ्यांना तसेच ठेवून नीरेकडे निघून गेला आहे. रथामागील वारकरी भजन म्हणत ठिय्या आंदोलनावर ठाम आहेत.