कराड प्रतिनिधी | 260 कराड दक्षिण मतदार संघात मतमोजणी निरीक्षक म्हणून श्रीमती वंदना डिसोडिया दाखल झाल्या असून त्यांनी शासकीय धान्य गोदाम कराड येथील स्ट्रॉंगरूम सह मतमोजणी टेबल व्यवस्था संगणकीय कक्ष व इनकोअर कक्ष तसेच इतर अनुषंगिक व्यवस्थेस भेट देऊन तपासणी व पाहणी केली. तसेच मतमोजणीसाठी सज्ज झालेली टेबल व्यवस्था व अन्य विभागाची पाहणी केली. प्रारंभी श्रीमती डिसोडिया यांनी मतमोजणी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गास भेट दिली.
मतमोजणी दरम्यान मतमोजणी मायक्रो ऑब्जरवर, सुपरवायझर सहाय्यक सुपरवायझर व अन्य कर्मचारी यांनी भारत निवडणूक आयोगाने घालून दिलेले नियम व घ्यावयाची दक्षता याबाबत माहिती देऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी संगणक व इनकोअर कक्षास भेट देऊन माहिती घेतली. कराड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी मतदान मोजणीसाठी आवश्यक असलेली संपूर्ण व्यवस्था सज्ज असल्याचे सांगितले. तसेच श्रीमती डीसोडिया यांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत समर्पक माहिती दिली.
यावेळी इंटरनेट यंत्रणा, एमएसईबी यंत्रणा तसेच इतर अन्य आवश्यक यंत्रणेचे विभाग प्रमुख यांना बोलावून श्रीमती डीसोडिया यांनी माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या व कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलेल्या मतदान यंत्र कक्षास भेट दिली. तेथील कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहून समाधान व्यक्त केले व तेथील सीसीटीव्ही यंत्रणेची माहिती घेऊन तपासणी केली. त्याचबरोबर तेथे ठेवण्यात आलेली अत्यंत महत्त्वाची रजिस्टर तपासून तेथील अधिकाऱ्यांना व ड्युटीवरील सिक्युरिटी फोर्स ला काही प्रश्न विचारून माहिती घेतली.
तत्पूर्वी आज सकाळी डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी 260 कराड दक्षिण मतदार संघातील मतमोजणी ठिकाणास भेट देऊन सर्व यंत्रणेची पाहणी केली. यामध्ये मतमोजणी टेबल व त्या अनुषंगाने सर्व माहिती जाणून घेतली तसेच त्यांनी मतदान यंत्रे सुरक्षा कक्षास भेट देऊन माहिती घेत पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना परिसरातील सुरक्षिततेबाबत घ्यावयाची दक्षता व महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप कोळी, आचारसंहिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी एस एस पवार, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, प्र.नायब तहसीलदार युवराज पाटील उपस्थित होते.