“जो करेल मला मंत्री, त्याचा होणार मी वाजंत्री”; पाटणमध्ये उद्धव ठाकरेंचा शंभूराज देसाईंवर हल्लाबोल

0
31
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । “शिवसेना म्हणजे काय गांडुळांची औलाद आहे? असं तुम्हाला वाटतं. म्हणजे शिवसेनेनं मंत्री केलं तेव्हा शिवसेनेत. आता गद्दारांबरोबर जाऊन मंत्री होणार म्हणून तिकडे. जो करेल मला मंत्री, त्याचा होणार मी वाजंत्री. बस वाजंत्री वाजवत. “पाटणमध्ये एक गद्दार आहे. तो राज्यातील मंत्री लुटमार मंत्री आहे. त्याने मंत्री असताना सरकारी पैशांचा वापर कसा केला हे मला माहिती आहे. फक्त सत्ता येऊ द्या, त्यानंतर यांची सगळी प्रकरणं मार्गी लावतो”, असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना दिला. तसेच हर्षद म्हणाला साहेब मी एकटा लढतोय. अरे एकटा कुठे मी आहे ना तुझ्यासोबत. जनता आहे. तीन उमेदवारांमध्ये एक आहे लुटमार मंत्री, असे ठाकरे यांनी म्हंटले.

पाटण विधानसभा मतदार संघात शिअवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार हर्षद कदम यांच्या प्रचारासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेत महायुतीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ठाकरे म्हणाले की, शिवसेनेनं हे चाळे कधी केले नाहीत. राजकीय वैमनस्य असेल तर उघडपणे करायचं. आज शिवसेनाप्रमुखांचा स्मृतीदिन आहे. काही जाहीराती या गद्दारांनी दिल्या आहेत. गद्दारा पहिले तू माझ्या वडिलांचा फोटो वापरायचा सोड. नामर्दाची औलाद तुझ्यात हिंमत असेल तर स्वत:च्या वडिलांचा फोटो लाव आणि मग मत मागायला ये. मग कसे जोडे खातो ते बघ”

ज्याप्रकारे मी बाकी उमेदवारांना देतो आहे त्याचप्रमाणे मी या शिंदेला दिल होत खूप काही दिल होत. याला होम मिनिस्टर केला होता पण याने काय केल, पोलीस प्रशासनाचा वापर केला आणि मिध्यांना पळून जायला मदत केली, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

घरच्या लग्नासाठी एक्साईज (राज्य उत्पादन शुल्क) लुटलं…

ज्याने घरच्या लग्नासाठी एक्साईज (राज्य उत्पादन शुल्क) लुटलं. अधिकारी वापरले. पैसे वापरले. असं काही समजू नका. त्यांच्या दुर्देवाने मी सुद्धा अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो. माझे सुद्धा प्रशासकीय विभागात काही संबंध आहेत. पैशांचा वापर कसा झाला, पैसे कुठे गेले? हे मला सांगत असतात. जरा थांबा. आमची सत्ता आल्यानंतर ही सर्व प्रकरणं मी कशी मार्गी लावतो ते बघा. लुटमार मंत्र्यांनी पैसे लुटलेत. जनतेला आणि महाराष्ट्राला लुटलंय. त्या लुटमारीचे पैसे वाटून पुढची तयारी करत आहेत”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपची नीती आहे तोडा फोडा राज्य कराची…

भाजपची नीती आहे तोडा फोडा राज्य करा. मोदींनी आपल सरकार पाडल कारण त्यांना महाराष्ट्र लुटायचा होता आणि तो मी लुटू देत नव्हतो म्हणून यांनी पहिला घाव हा शिवसेनेवर घातला जीला मराठी माणसाच्या आणि या महाराष्ट्राच्या न्यायासाठी हिंदुहृदयसम्रटांनी तयार केलं. शहजादा म्हणजे ते राहुल गांधींच्या मुखातून बाळासाहेबांसाठी दोन शब्द ऐकु इच्छितात. काल शिरळीमध्ये प्रियंका गाधी आल्या होत्या त्या म्हणाल्या मी राहुलची बहिण आहे आणि त्या बाळासाहेबांबद्दल चांगलं बोलल्या. म्हणजे भाजपचे दात घातले घशात, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे.