सातारा प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील ढाणकल गावच्या हद्दीत एका मोठ्या धोकादायक वळणावर मंगळवार दि. 6 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक डाव्या बाजूला डोंगराच्या टेकडीला जावून धडकला. या अपघात चालक आणि क्लिनर दोघेही जागीच ठार झाले. लहू त्रंबक माने (वय 30) व क्लिनर अक्षय कांबळे (वय 27 दोघे रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे), अशी मृतांची नावे आहेत. कोयनानगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.
याबाबत कोयनानगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चिपळूणहून कराडच्या दिशेने निघालेला मालवाहू ट्रक (क्र. एम. एच. 42. ए. क्यु. 9097) हा पाटण तालुक्यात कोयना विभागातील घाटमाथा परिसरात आला असता चिपळूण-कराड मार्गावर मंगळवार दि. 6 रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास भरधाव ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट डाव्या बाजूकडील डोंगराच्या टेकडीला जावून धडकला.
या अपघातात ट्रक चालक लहू त्रंबक माने (वय 30) व क्लिनर अक्षय कांबळे (वय 27 दोघे रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे) हे दोघेजण जागीच ठार झाले. अपघातात ट्रकचे केबीन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच कोयनानगर पोलीस स्टेशनचे सपोनि विजय गोडसे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा केला. पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या अपघाताचा अधिक तपास कोयनानगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे करत आहेत.