कराड प्रतिनिधी । एमडी ड्रग्ज रॅकेटमध्ये कराड शहर पोलिसांनी कराडातील एका व्यावसायिकाच्या मुलाला रविवारी पुणे विमानतळावरून अटक केली होती. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. 27 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुजल उमेश चंदवानी, सौरभ संदीप राव असे पोलीस कोठडी मिळालेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गेल्या महिन्यापूर्वी कराड शहर व परिसरामध्येही पोलिसांनी ओगलेवाडी येथे छापा टाकून (एमडी) ड्रग्ज विक्री करणाऱ्यांना अटक केली होती. त्याचे धागेदोरे सुरूवातीला मुंबई त्यानंतर परदेशापर्यंत पोहचले होते. या प्रकरणी पोलिस तपास सुरू होता. यापूर्वी अटक केलेल्या संशयितांबरोबर सुजल चंदवानी व सौरभ राव याचे कॉल रेकॉडींग पोलिसांना मिळून आले आहे. फोन कॉलमधून काही धक्कादायक माहिती पोलिसांना समजली होती.
या ड्रग्ज प्रकरणामध्ये चंदवानी व राव हे दोघे पोलिसांना हवे होते. पोलिसांनी गौरव राव याला गजानन हौसिंग सोसायटी येथून अटक केली. त्यानंतर पोलिसां पुण्याच्या विमानतळावरून सुजल चंदवानी याला अटक केली. सुजल चंदवानी याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. 27 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर करीत आहेत.