ओगलेवाडी MSEB शासकीय कार्यालयात चोरी प्रकरणी दोघांना अटक; 6 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । ओगलेवाडी येथील MSEB च्या शासकीय कार्यालयाचे स्टोअर्स रुममध्ये चोरीची घटना दि. 24 फेब्रुवारी रोजी घडली होती. यामध्ये अज्ञात इसमांनी अॅल्युमिनीअम कंडक्ट 500 मीटर व इतर साहित्या असा एकुण 6 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला होता. या प्रकरणी 2 आरोपीना कराडच्या डीबी शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून 6 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अजय जगन्नाथ चंणे (वय 26), रंजीत नवनाथ सुर्यवंशी (वय 27, रा. हजारमाची ओगलेवडी ता. कराड जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ओगलेवाडी येथील चोरीच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कराड शहर गुन्हे प्रकटीकरण पथकास गुन्ह्यातील आरोपींचा शोघ घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पथकातील अधिकारी पतंग पाटील व पथकाने गुन्हयाचा तपास सुरु केला.

घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही फुटेज नसल्या कारणाने तपास पुर्णतःहा हाताच्या बाहेरील होता. पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील यांना तपासाची मदार हि फक्त गोपनिय बातमीदारवर असल्याची कल्पना असले कारणाने त्यांनी सदर भागातील बातमीदारांना अर्स्ट करुन माहिती मिळवली असता ओगलेवाडी परीसरातील 03 इसमांनी सदरची चोरी केल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार सापळा रचुन आरोपी नामे अजय जगन्नाथ चंणे वय 26 वर्षे, रंजीत नवनाथ सुर्यवंशी वय 27 वर्षे राहणार हजारमाची ओगलेवडी ता. कराड जि. सातारा यांना ताब्यात घेवुन अटक केली आहे. सदर आरोपीचे ताब्यातून एकुण 6,10,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन.पाटील सो. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवा. सुर्यवंशी हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख , अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकुर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील सो.कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील सो, सफौ विवेक गोवारकर, सफौ रघुवीर देसाई, सफौ संजय देवकुळे, पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, सुर्यवंशी, पोलीस नाईक, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पो.शि. संग्राम पाटील , अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे. महेश शिंदे, आनंदा जाधव, सोनाली, पिसाळ यांनी केलेली आहे.