कराड प्रतिनिधी | कराड बसस्थानक परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. नितीन तुकाराम बसनूर (रा. येणपे, ता. कराड) आणि विजय संजय डुबल (रा. कडेगाव, जि. सांगली), अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
कराड बसस्थानक परीसरातून दि. 30 डिसेंबर 2023 रोजी कृणाल जाधव यांच्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकलची चोरी झाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांनी डी. बी. पथकास छडा लावण्याचे आदेशित केले होते. डीवी पथक प्रमुख उप निरीक्षक पंतग पाटील यांचे पथक कराड शहरात गस्त करत असताना त्यांना दोन मोटरसायकल भेदा चौकात येणार आल्याची बातमी मिळाली. त्यानुसार पथकाने संशयितांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी एस.टी. स्टॅण्ड परिसरातुन दुचाकीची चोरी केल्याची कबुली दिली.
संशयितांकडून स्पेल्डर प्लस, यामाहा कंपनीची एम. प्लस-50, बजाज कंपनीची पल्सर अश्या एकुण 3 लाख 60 हजार किंमतीच्या 3 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकुर, पोलीस निरीक्षक के. एन. पाटीलयांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उप निरीक्षक पतंग पाटील, सहाय्यक फौजदार संजय देवकुळे, रघुवीर देसाई, हवालदार शशिकांत काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदीप कोळी, महेश शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी ही कारवाई केली.