मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘या’ मार्गे सुरू राहणार वाहतूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । २६०-कराड दक्षिण व २५९- कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया उया दि. २३ रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होत आहे. त्यामुळे उद्या सकाळची ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत कराड शहरातील अंतर्गत वाहतुक सुरळीत रहावी यासाठी अंतर्गत वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. दोन्ही मतदानाच्या मोजणी केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला जाणारा असून मतमोजणी मुख्य केंद्र परिसर मार्गात वाहतुकीत अडथळा होऊ नये या अनुषंगाने उद्या वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने २६० कराड दक्षिण मतदार संघाच्या मतदान पेट्या रत्नागिरी गोडावुन,मार्केटयार्ड येथे तर २५९ कराड उत्तर विधानसभा मतदार संघाच्या मतदान पेट्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. सदर दोन्ही ठिकाणी व परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

तसेच रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने, पोलीस दलाची वाहने व निवडणूक प्रक्रियेची वाहने वगळता या बदलाची सर्व वाहनधारकांनी नोंद घेऊन पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

260 कराड दक्षिण मतमोजणी केंद्र मार्गावर असा राहणार वाहतूक बदल

१) मार्ग क्र.१ – दि.२३ रोजी  विजय दिवस चौक येथुन भेदा चौक बाजुकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना (एस.टी. बस वगळून) प्रवेश बंद करणेत आला असून, सदरची वाहने विजय दिवस चौक येथुन दत्त चौक, पोपटभाई पेट्रोल पंप मार्गे कोल्हापुर नाका बाजुकडे जातील. तसेच एस.टी. बस ही विजय दिवस चौक येथुन टी पॉईन्ट मार्गे एस.टी. स्टॅन्ड येथे व त्याच मार्गे परत बाहेर येतील.

२) मार्ग क्र.२ – कार्वेनाका बाजुकडुन भेदा चौकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना गेट नं. ४ येथुन भेदा चौक बाजुकडे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे, सदरची वाहने गेट नं.४ येथुन बैलबाजार रोड, मलकापुर, हायवे रोड मार्गे कराड शहरात जातील.

३) मार्ग क्र.३ – पोपटभाई पेट्रोल पंप येथुन भेदा चौक बाजुकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना (मतदान प्रक्रियेतील वाहने वगळून) प्रवेश बंद करण्यात आला असुन, सदरची वाहने शाहु चौक, दत्त चौक मार्गे कराड शहरात व सैदापुर कॅनॉल बाजुकडे जातील व कार्वेनाका, कार्वे, शेणोली बाजुकडे जाणारी सर्व वाहने कोल्हापुर नाका येथुन हायवे रोडने मलकापुर बैल बाजार रोड मार्गे कार्वे, शेणोली बाजुकडे जातील.

४) मार्ग क्र.४ – वरीष्ठ पोलीस निरीक्षक, कराड शहर पोलीस ठाणे यांचे निवासस्थान येथुन भेदा चौक बाजुकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असुन, सदरची वाहने वरीष्ठ पोलीस निरीक्षक, कराड शहर यांचे निवासस्थानापासुन प्रांत कार्यालय, शाहु चौक मार्गे पोपटभाई पेट्रोल पंप व कोल्हापुर नाका बाजुकडे जातील.

५) मार्ग क्र.५ – अंबिका मेस येथुन भेदा चौक व प्रांत कार्यालयाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असुन, सदरची वाहने कराड शहर पोलीस स्टेशन मार्गे शाहु चौक व एस.टी. स्टॅन्ड बाजुकडे जातील.

६) मार्ग क्र.६ – गेट नं. १ ते बैलबाजार रोड व भेदा चौक ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जाणारा संपुर्ण रोड मतपेटी नेणाऱ्या एस.टी. बस व मतदान प्रक्रियेतील वाहनांचे पार्किंगसाठी आरक्षित करण्यात आला असुन, सदर रोडवर खाजगी वाहने पार्किंग करण्यास मनाई करणेत आली आहे.

७) मार्ग क्र.७ – कराड शहरातुन कार्वेनाका, कार्वे, शेणोली बाजुकडे जाणारी सर्व वाहने कोल्हापुर नाका येथुन हायवे रोडने मलकापुर, बैल बाजार रोड मार्गे कार्वे, शेणोली बाजुकडे जातील.

२५९ कराड उत्तर मतमोजणी केंद्र परिसरातील वाहतुक मार्गात असा आहे बदल

१) मार्ग क्र.१ –  महालक्ष्मी चौक, कराड येथुन मुंबई आईस्क्रीम चौक बाजुकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करणेत आला असुन, सदरची वाहने कोल्हापुर नाका येथुन हायवे रोड, मलकापुर, बैल बाजार मार्गे जातील.
२) मार्ग क्र.२ – बैलबाजार रोड, कराड येथुन महालक्ष्मी चौक बाजूकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना मुंबई आईस्क्रीम चौक येथून प्रवेश बंद करण्यात आला असून सदरची वाहने बैल बाजार रोड मलकापूर हायवे मार्गे कराड शहरात जातील.

३) मार्ग क्र.३) सुपर मार्केट, कराड येथुन गणेश हॉस्पीटलकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

४) मार्ग क्र.४) मोहीते हॉस्पीटल, कराड येथुन स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल, कराड बाजुकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करणेत आला आहे.

५) मार्ग क्र.५) मुंबई आईस्क्रीम ते स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथील संपुर्ण रोड, झेंडा चौक ते गणेश हॉस्पीटल जाणारा संपुर्ण रोड व पी.डी. पाटील उद्यानासमोरील कॉलनीतील रोड  मतदान प्रक्रियेतील वाहनांच्या पार्किंगसाठी  आरक्षित करण्यात आला असुन, सदर रोडवर खाजगी वाहने पार्कीग करणेस मनाई करण्यात येत आहे.