कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ५ एप्रिल रोजी होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात आमदार मनोज घोरपडे यांनी दंड थोपटले आहेत. सध्या अर्ज माघारी प्रक्रिया सुरू असून उद्या दि. २१ मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
सह्याद्री सहकारी कारखाना निवडणुकीत २५१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत काही अर्ज बाद झाले आहेत. अन् २०५ अर्ज उरले. अवैध अर्ज झालेल्या दहा जणांनी पुणे येथील प्रादेशिक सह संचालिका नीलिमा गायकवाड यांच्याकडे अपील केले होते. त्याची १३ मार्च रोजी सुनावणी झाली होती. तर १८ मार्च रोजी त्याचा निकाल लागला असून, १० पैकी ९ अर्ज वैध ठरले आहे.
तर सत्ताधारी गटाच्या एकाचा अर्ज अवैधच ठरविण्यात आला आहे. सध्या अर्ज माघारी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत या निवडणुकीतून फक्त ४ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. दरम्यान, २१ मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.