अज्ञात हल्लेखोरांचा फळविक्रेत्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; 3 संशयित पोलिसांच्या ताब्यात

0
642
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । एका फळविक्रेत्या युवकावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना हीखंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे शनिवारी सायंकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एस.टी. स्टॅंडजवळ घडली. या परकरणी पोलिसांनी तीन संशयितास ताब्यात घेतले आहे.

तौफिक रहेमान बागवान (वय २८, रा. शिरवळ, ता. खंडाळा) असे जखमी युवकाचे नाव आहे, तर प्रशांत कांबळे (२०) व अन्य दोघे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबात घटनस्थाळावरून मिळालेली माहिती अशी की, तौफिक बागवान व त्याचा भाऊ इरफान बागवान हे एसटी स्टँड परिसरात फळविक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी रात्री दोघे भाऊ दुचाकीवरून चौपाळा येथे फळे देण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना ओळख असलेल्या प्रशांत कांबळे (२०) याने त्यांची दुचाकी थांबवत केळीचे एक कॅरेट मिळेल का? अशी विचारणा करत मोबाईल नंबर घेतला.

दरम्यान, तौफिक (वय २९, रा. शिरवळ) हा दुकानावर एकटा असताना प्रशांत कांबळे व दोन युवक तेथे आले. बहिणीचा साखरपुडा आहे केळी वाटायचे आहे, असे सांगितले. यासाठी तौफिक केळी काढत असताना प्रशांत व इतर दोघांनी अचानक त्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकत कोयत्याने वार केला. वार झाल्यानंतर तौफीक हा परिसरातच असणाऱ्या मामाच्या दुकानाकडे पळून गेला. यावेळी हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांची गर्दी झाल्याने त्यांनी पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, हल्लेखोरांना तौफिकवर १२ ते १४ वार केले असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याची नोंद शिरवळ पोलिस ठाण्यात झाली आहे.

शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिद, पोलिस हवालदार दत्तात्रय धायगुडे, पो अंमलदार भाऊसाहेब दिघे, अरविंद बाराळे, दीपक पालेपवाड, सूरज चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली. अंडी तिघा संशयितास ताब्यात घेतले. तसेच तीन हल्लेखोर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिरवळ पोलिस करत आहेत.