सातारा प्रतिनिधी | सातारा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि फलटण ग्रामीण पोलिसांनी पिंपरद (ता. फलटण) गावच्या हद्दीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून ६ लाख ४१ हजार रुपये किंमतीचा २५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सुनील भांग्या पावरा (रा. रोहिणी, ता. शिरपूर, जि धुळे), उमेश भाईदास पावरा (रा. बोराडी, ता. शिरपूर, जि धुळे) आणि राजेंद्र बबनराव कापसे (रा. निंबळक, ता. फलटण) यांना अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून १ मोटारसायकल आणि २ मोबाईलही जप्त केले आहेत.
पिंपरद (ता. फलटण) गावच्या हद्दीतील गगनगिरी मंगल कार्यालयासमोर तीन जण मोटारसायकलवरून (एम. एच. ११ बी. डब्ल्यू ५२९८) गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांना कारवाई करण्याचे आदेश देवकर यांनी दिले. एलसीबीच्या पथकाने फलटण ग्रामीण पोलीस पोलिसांच्या मदतीने सापळा रचला.
खबर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गगनगिरी मंगल कार्यालयासमोर तीन जण मोटरसायकलवरून आले. संशयावरून त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे २५ किलो गांजा आढळून आला. गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल तसेच दोन मोबाईल हँडसेट पोलिसांनी जप्त केले. संशयीतांवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
एलसीबीचे पोलीस पोलीस अरुण देवकर, पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, रविंद्र फार्णे, विशाल वायकर, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, अंमलदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, मंगेश महाडीक, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, सनी आवटे, मुनीर मुल्ला, राजू कांबळे, शिवाजी भिसे, अजित कर्णे, मनोज जाधव, अमित झेंडे, हसन तडवी, केतन शिंदे, धीरज महाडीक, अनिल खटावकर, अमोल निकम, दत्ता चव्हाण, अमृत कर्पे तसेच फलटण ग्रामीणचे पोलीस अंमलदार शांतीलाल ओंबासे, श्रीकांत खरात, सुरज काकडे, नितीन चतुरे यांनी ही कारवाई केली.