कराडात एसटी प्रवासात एक लाखाच्या पाटल्या लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | एसटी प्रवासात महिलेच्या हातातील सुमारे एक लाख रुपये किमतीच्या अडीच तोळे वजनाच्या पाटल्या चोरट्यांनी लंपास केल्या. शहरातील कोल्हापूर नाका येथे ही घटना घडली. याबाबत सिंधू पवार (रा. कोकीसरे, ता. पाटण) यांनी कराड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पाटण तालुक्यातील कोकीसरे येथील सिंधू पवार या पती आत्माराम पवार यांच्यासह कहऱ्हाडला आल्या होत्या. शहरातील रुग्णालयात त्यांच्या नातेवाइकांवर उपचार सुरू होते. नातेवाइकांची भेट झाल्यानंतर त्या व त्यांचे पती गावी जाण्यासाठी कोल्हापूर नाक्यावर आले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी कराडहून चिपळूणकडे जाणारी एसटी आली. त्यावेळी सिंधू पवार व त्यांचे पती एसटीमध्ये चढले. गर्दी असल्यामुळे सिंधू पवार यांच्या पाठीमागे दोन पुरुष, तर समोर एक महिला गर्दीत उभी होती. काही वेळाने ते तिघेही एसटीतून खाली उतरले. त्यानंतर एसटी पाटणकडे मार्गस्थ झाली.

नवारस्ता येथे एसटी पोहोचल्यानंतर सिंधू पवार यांनी हातात पाहिले असता त्यांच्या एका हातात असलेली अडीच तोळे वजनाची एक लाख रुपये किमतीची पाटली चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.