पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या मतदार संघात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत फोडली 4 दुकाने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात रात्रीच्यावेळी घरफोडीचे प्रकार घडत आहेत. मागील महिन्यात कराड तालुक्यात घरफोडीचा प्रकार झाल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता चोरटयांनी आता आपला मोर्चा राज्य उत्पादन शुल्कमंत्री था सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदार अंग असलेल्या पाटण तालुक्याकडे वळवला आहे. पाटण शहरातील मुख्य बाजारपेठेतील चार दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 25 हजार 500 रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याची नोंद पाटण पोलिसात झाली आहे. दरम्यान, भरवस्तीत ही चोरी झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार, दि. 23 रोजी रोजी रात्रीच्या सुमारास जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने पाटण शहरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. याचाच फायदा घेत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य बाजारपेठेतील चार दुकाने फोडली. यावेळी चोरटयांनी रोख रक्कम देखील लंपास केली आहे. यात हेमंत किसन फाटक यांच्या बिल्वदल बझारचे शटर फोडून 24 हजार रुपये, विजय लुगडे यांचे किराणा दुकान फोडून 500 रुपये व सुनील फुटाणे यांची बेकरी फोडून 1 हजार रुपये असा एकूण 25 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून चोरटे लंपास झाले आहेत.

दुसऱ्या दिवशी सोमवारी पहाटेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी संबंधित दुकानमालक गेले असता दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान लायब्ररी चौक येथील ट्रॉफी दुकानातहून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली आहे. या घडलेल्या प्रकाराची फिर्याद दुकान मालकांनी पाटण पोलिसात दिली असून याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. राऊत करत आहेत.