दिवशी घाटातून जाताय सावधान; जीव मुठीत धरून स्थानिकांना करावा लागतोय प्रवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात हवामान विभागाकडून आज रेड अलर्टचा इशारा देण्यात आला असल्याने जिल्हा प्रशासनाकडून सतर्कता बलागली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्रीच जिल्ह्यातील पर्यटनस्थळे हि दि.२८ रोजीपर्यंत पर्यंतचा बंद केलेली आहेत. कारण या ठिकाणी जाणाऱ्या घटस्त्यावर दरडी कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, ढेबेवाडी-पाटण रस्त्यावरील दिवशी घाटामध्ये अनेक ठिकाणी दरडी सुटलेल्या आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने घाटात छोट्या मोठ्या दरडी पडत आहेत. त्यामुळे घाटातून वाहने चालवताना वाहनधारक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मुसळधार पावसामुळे घाटात दरडी पडत असल्याने घाटातून प्रवास करताना धोक्याचे झाले आहे. कोणत्या क्षणी दरड कोसळेल हे सांगता येत नाही. या घाटामध्ये अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या दरडी यापूर्वी कोसळल्या आहेत. सध्या अनेक ठिकाणी धोकादायक स्थिती असून प्रवासी व वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

दिवशी घाटामध्ये अनेक ठिकाणी डोंगराचा सुटलेला भाग कधीही ढासळण्याची शक्यता आहे. दिवशी घाट अरुंद व वळणा-वळणाचा असल्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी धोक्याचा बनत आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनचालकांना जीवावर दगड ठेवूनच प्रवास करावा लागत आहे. घाटामध्ये अनेक ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ढेबेवाडी भागातील अनेक गावांना पाटण हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे शासकीय कामासाठी तसेच खरेदीसाठी पाटणला जावे लागते.

महाविद्यालयीन शिक्षणासाठी दररोज शेकडो विद्यार्थी या घाटातून पाटणकडे जात असतात. या घाटातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते. सध्या अनेक दरडी धोकादायक स्थितीत आहेत त्यामुळे कधीही येथे मोठी दुर्घटना घडू शकते.

पर्यटकांना दि.28 जुलै पर्यंत ‘या’ ठिकाणी जाण्यास बंदी

मुसळधार पावसामुळे पर्यटनस्थळी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील लिंगमळा व भिलार धबधबा तसेच सर्व पर्यटनाचे पॉईंट, पाटण तालुक्यातील ओझर्डे (नवजा) व सडावाघापूर धबधबा, सातारा तालुक्यातील ठोसेघर, केळवली, वजराई-भांबवली धबधबा, कास तलाव तसेच जावली तालुक्यातील एकीव ही धबधब्याची ठिकाणे आणि सातारा जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे तात्पुरती बंद करण्याचा आदेश दिला आहे. अतिवृष्टीच्या कालावधीत पर्यटकांना दि.28 जुलै पर्यंत संबंधित ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.