आगाशिवनगरच्या डोंगरावरून पडून युवकाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | जखिणवाडी ता. कराड येथील आगाशिव डोंगरावरून पडून कोयना वसाहत येथील 17 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. 26 जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याची सुमारास ही घटना घडली.

सोहम दिनकर शेवाळे (वय 17) रा. कोटणीस हॉल समोर, कोयना वसाहत ता. कराड असे मयत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी दिनकर रघुनाथ शेवाळे यांनी कराड शहर पोलिसात खबर दिली असून याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे.

17 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. या मृत्यू पार्करणाचा पोलिसांकडून देखील अधिक तपास केला जात आहे.