महाबळेश्वरमध्ये ‘इतक्या’ मिलीमीटर पावसाची नोंद; कोयना धरणाचा पाणीसाठा झाला 33.84 TMC

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. गुरुवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना येथे 29 तर नवजाला 47 आणि महाबळेश्वरमध्ये 73 मिलीमीटर झाला. यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली असून पाणीसाठा 33.84 टीएमसी झाला आहे. परिणामी धरण 32.15 टक्के भरले आहे.

सातारा जिल्ह्यातील धरणक्षेत्रातही पावसाने जेमतेम हजेरी लावली असल्यामुळे धरणातील पाणीसाठा अजून मोठ्या प्रमाणात वाढलेला नाही. मात्र, कोयना धरणक्षेत्रात सतत पाऊस पडत असून पाणीसाठा वाढू लागला आहे. हे धरण पूर्ण भरण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.

कोयनानगर येथे जूनपासून आतापर्यंत 1 हजार 635 मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर नवजाला आतापर्यंत 1 हजार 830 मिलीमीटर पाऊस झाला. महाबळेश्वरला 1 हजार 469 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कोयना धरणात सध्या 6 हजार 68 क्यूसेक वेगाने पाणी येत आहे.

Koyna Dam

Date: 12/07/2024
Time: 05:00 PM
Water level: 2083’06” (635.051m)

Dam Storage:
Gross: 33.84 TMC (32.15%)
Live: 28.72 TMC (28.68%)

Inflow : 6,068 Cusecs.

Discharges
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs

Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 29/1635
Navaja- 47/1830
Mahabaleshwar- 73/1469