पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा वाढला जोर कमी झाला असल्यामुळे धरण क्षेत्रांत पाण्याची आवक कमी झाली आहे. कराड आणि पाटण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणाचा एकूण पाणीसाठा 15.17 टीएमसी झाला असून, सुमारे 14.41 टक्के धरण भरले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असल्यामुळे धरणात होणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. धरण क्षेत्रात मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 15.17 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तसेच गेल्या 24 तासात कोयनेला – 71 मिलीमीटर, नवजा – 95 मिलीमीटर व महाबळेश्वरला – 28 मिलीमीटर पाऊस पडला. कोयना धरणाची पाणी पातळी 2042”10” (622.656m) इतकी झालेली आहे.
सातारा जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस १० जूननंतर दाखल झाला. त्यानंतरही पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे पेरण्यांना उशीर झाला होता. यंदा मात्र, मान्सून वेळेवर दाखल झाला आहे. जिल्ह्यात गुरूवारपासूनच पाऊस पडू लागलेल्या पावसामुळे पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, कोयना, नवजा या भागात छोट्या ओढ्याना पाणी आले आहे. तर पूर्व भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यांतील अनेक गावांत पावसाने हजेरी लावली आहे. सध्या पावसाने उघडीप दिली.
कोयना धरणात किती पाणी याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खालील आकडेवारी पहा –
Koyna Dam : Date: 11/06/2024
Time : 08:00 AM
Water level : 2042”10” (622.656m)
Dam Storage : Gross: 15.17 TMC (14.41%)
Live : 10.05 TMC (10.03%)
Discharges :
KDPH : 00 Cusecs.
Total Discharge in koyna River : 00 Cusecs
Rainfall in mm – (Daily/Cumulative) :
Koyna – 71/166
Navaja – 95/197
Mahabaleshwar – 28/96