कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचा पाणीसाठा झाला ‘इतका’ TMC

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगलाच वाढत असून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नवजा येथे 97 मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे 72 आणि महाबळेश्वरला 155 मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात पाण्याची चांगली आवक सुरू झाली आहे. मागील 3 आठवड्यापासून पाऊस पडत आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान, कोयना धरणात सध्या 20.04 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळासह पाटण तालुका आणि कांदाटी खोऱ्यात पाऊस सुरू झाल्याने धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाने लावलेल्या हजेरीमुळे भुईमुगासह सोयाबीन आदी बियाणांची ठिकाणची पेरणीची कामे शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे पडलेला आहे. तसेच पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी भागातही दमदार हजेरी लागल्यामुळे ओढ्यांना पाणी वाहिले. तसेच बंधाऱ्यातही पाणीसाठा झाला आहे. दि. 1 जूनपासून कोयनेला 843 आणि महाबळेश्वरमध्ये 863 मिलीमीटर पाऊस पडला आहे.

Koyna Dam

Date : 01/07/2024
Time : 08:00 AM
Water level : 2055”05” (626.491m)

Dam Storage :
Gross : 20.04 TMC (19.04%)
Live : 14.92 TMC (14.90%)

Inflow : 11,943 Cusecs.

Discharges

KDPH : 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs

Rainfall in mm – (Daily/Cumulative)

Koyna- 72/843
Navaja- 97/1072
Mahabaleshwar- 155/863