कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला; धरणात 70.96 टीएमसी इतका पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पडत असलेल्यामुसळधार पावसामुळे कोयना आणि कृष्णा नदीतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. सायंकाळी पाच वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात एकूण 55 हजार 522 पाण्याची आवक झाली असून धरणात 70.96 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर कोयना येथे 67 तर नवजाला 106 मिलीमीटर पर्जन्यमान झाला आहे. दरम्यान, कोयना धरणाचा पाणीसाठा 70.96 टीएमसी इतका झाला आहे.

कोयना पाणलोटात बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात कोयनानगरला सर्वाधिक 162 मिलीमीटर एकूण 2894, महाबळेश्वरला 157 एकूण 2801 नवजाला 157 एकूण 3385 मिलीमीटर असा सरासरी पावसाचॆ नोंद झाली आहे.

कोयना धरणात आवक वाढली असून बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारापर्यंत 55 हजार 522 क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातून 1050 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

Koyna Dam

Date: 24/07/2024
Time: 05:00 PM
Water level: 2131’00” (649.529m)

Dam Storage:
Gross: 70.96 TMC (67.42%)
Live: 65.84 TMC (65.75%)

Inflow : 55,522 Cusecs.

Discharges
KDPH: 1050 Cusecs.
Total Discharge in koyna River: 1050 Cusecs

Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 67/2961
Navaja- 106/3491
Mahabaleshwar- 91/2892