पावसाची उघडीप; कोयना धरणातील पाणीसाठा झाला 33.03 TMC

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी तीन ते चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या, २४ तासांत महाबळेश्वरला फक्त 22 आणि नवजा येथे 55 मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली तर कोयना धरणात पाणी आवक सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा 33.03 टीएमसीवर पोहोचला आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण चांगले राहिले आहे. तरीही पावसात खंड पडत आहे. १५ दिवसांच्या काळात धरणातील पाणीसांठ्यात काही प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यातच हवामान विभागाने सातारा जिल्ह्याला दि. ८ आणि ९ जुलै रोजी रेड अलर्ट दिला होता. त्यामुळे मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला. पण, रेड अलर्ट असूनही मोठा पाऊस झाला नाही. उलट रिमझिम पाऊस झाला.

बुधवारी सकाळपर्यंतच्या, २४ तासांत कोयनानगर येथे अवघा 30 मिलिमीटर पाऊस झाला आहे. एक जूनपासून आतापर्यंत 1 हजार 593 मिलिमीटर पर्जन्यमान झाले तर नवजा येथे आतापर्यंत एकूण 1 हजार 763 तर महाबळेश्वरमध्ये 1 हजार 374 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. त्यातच पाऊस कमी झाल्याने कोयना धरणातही पाण्याची आवक सावकाश होऊ लागली आहे.

Koyna Dam

Date: 11/07/2024
Time: 08:00 AM
Water level: 2082’01” (634.619m)

Dam Storage:
Gross: 33.03 TMC (31.38%)
Live: 27.91 TMC (27.87%)

Inflow : 6,620 Cusecs.

Discharges
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs

Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 30/1593
Navaja- 55/1763
Mahabaleshwar- 22/1374