पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आज कमी झाला असून धरणात देखील पाण्याची आवक काहीशा प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, कोयना धरणातील विसर्गात वाढ करण्यात आली असून वीर धरणातूनही विसर्ग वाढविल्याने नीरा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात महाबळेश्वरला 90 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणातील पाणीसाठा 86.63 टीएमसी झाला आहे.
पश्चिम भागात कास, बामणोली, नवजा, तापोळा, कोयना, महाबळेश्वरला मागील २० दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तीन दिवसांपासून पाऊस पुन्हा चांगलाच पडू लागला आहे. त्यातच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस होत आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक वाढलेली असून सध्या धरणे ही ८० टक्क्यांवर भरली आहेत.
पाटण तालुक्यातील कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. गेल्या वर्षी हे धरण भरले नव्हते. यंदा मात्र धरण भरणार आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास धरणात 86.63 टीएमसी पाणीसाठा झाला होता, तर 45 हजार 870 क्युसेकने धरणात पाण्याची आवक होती. शुक्रवारपासून धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. शनिवारीही पायथा वीजगृहातून २ हजार १०० आणि सहा दरवाजांतून 52 हजार 100 क्युसेक वेगाने पाणी विसर्ग करण्यात येत होता. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
Koyna Dam
Date: 03/08/2024
Time: 05:00 PM
Water level: 2148’07” (654.888m)
Dam Storage:
Gross: 86.63 TMC (82.31%)
Live: 81.51 TMC (81.40%)
Inflow : 45,870 Cusecs.
Discharges
Radial Gate: 50,000 Cusecs.
KDPH: 2100 Cusecs.
Total Discharge in koyna River: 52,100 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 43/3980
Navaja- 16/4643
Mahabaleshwar- 45/4368