पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दोन दिवस काही भागात पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी काहीशा प्रमाणात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. शनिवारी सकाळपर्यंत नवजा येथे 80 मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तर कोयनानगर येथे 42 आणि महाबळेश्वरला 119 मिलीमीटरची नोंद झाली आहे. धरणात २२ दिवसांत १८ टीएमसीने पाणीसाठा वाढला असून धरणातील पाणीसाठा 34.60 टीएमसीवर पोहोचला आहे.
गुरूवारी रात्रीपासून पाऊस पडू लागला आहे. शुक्रवारी सकाळी रिमझिम पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर अकराच्या सुमारास जोरदार पाऊस पडू लागला. तर पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात दररोज पावसाची हजेरी आहे. पण, या पावसात सातत्य नाही. बुधवारी दमदार पाऊस झाला.
शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे 42 मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत 1 हजार 648 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 1 हजार 863 आणि महाबळेश्वरमध्ये 1 हजार 515 मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणात आवक वाढली असून शनिवारी सकाळच्या सुमारास 11 हजार 585 क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरण पाणीसाठा 34.60 टीएमसी झाला होता.
Koyna Dam
Date: 13/07/2024
Time: 08:00 AM
Water level: 2084’10” (635.457m)
Dam Storage:
Gross: 34.60 TMC (32.87%)
Live: 29.48 TMC (29.44%)
Inflow : 11,585 Cusecs.
Discharges
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 42/1648
Navaja- 80/1863
Mahabaleshwar- 119/1515