सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच टंचाईच्या झळा लोकाना सोसाव्या लागत आहेत. सातारा शहरासह जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असल्याने काही गावात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाऊ लागला आहे. अशातच प्रमुख धरणांत केवळ ३२ ते ४८ टक्केच पाणी शिल्लक असून जिल्ह्यातील सात धरणांनी तळ गाठला आहे.
सध्या जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा कमी झाला आहे. जिल्ह्यात पाच प्रमुख धरणे असून, या धरणात आता जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये कोयना ६२.०५, धोम ५.३६, धोम बलकवडी १.८३, कण्हेर ३.८३, उरमोडी ३.२४, तारळी ३.६९, येरळवाडी .०.१२ असा धनामध्ये पाणीसाठी शिल्लक आहे.
तसे पाहिले तर आतापर्यंत कण्हेर व उरमोडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी दुष्काळी भागाला सोडले केल्यामुळे खटाव तालुक्याकडे दुर्लक्ष झाल्याने पाणी संघर्ष समिती स्थापन करून याविरोधात आवाज उठवावा लागला आहे, तसेच दुष्काळी तालुक्याबरोबरच सातारा, जावळी, महाबळेश्वर, वाई या तालुक्यांतील दुर्गम भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. आगामी महिनाभरात ही टंचाई अधिक तीव्र होणार आहे.