सातारा प्रतिनिधी | सातारा शहराच्या पश्चिमेस कास धरणात मान्सूनपूर्वी मे महिन्याच्या अखेरीस ४५ फूट पाणीसाठा शिल्लक राहिला होता. सध्या परिसरात मान्सूनची जोरदार हजेरी असल्याने मागील पंधरवड्यात पाणीपातळीत एका फुटाने तर चालू आठवड्यात संततधारेसह अधूनमधून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पाणीपातळीत चार फूट वाढ होऊन एकूण ५० फूट पाणीसाठा धरणात झाला आहे.
कास धरणातून सातारा शहराला पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी जानेवारी जानेवारी महिन्यात सांडव्याची उंची अधिक वाढवून पावसाळ्यात एकंदरीत ७८.७२० फूट पाणीसाठा धरणात झाला होता. त्यापैकी पावणेअठरा फूट मृत पाणीसाठा आहे.
कास धरणाची उंची वाढविल्यानंतर मागील पावसाळ्यात ६१.०४८ फूट पाणीसाठा झाला होता. सध्या मागील दोन आठवडाभरात आतापर्यंत पाच फुटांनी पाणीपातळीत अधिक वाढ होऊन धरणात एकूण ५० फूट पाणीसाठा झाला आहे. कास धरण परिसरात यंदा समाधानकारक पाऊस झाला असून, धरणाची पातळी वेगाने वाढत आहे.