पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कोसल असल्यामुळे धरणाच्या जलाशयात हळू हळू पाण्याची भर पडत आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा 80.97 TMC इतका झाला असून सुमारे 76.93 टक्के इतक्या क्षमतेने धरण भरले आहे.
कोयना जलाशयात दिवसभरात प्रतिसेकंद 12 हजार 447 क्युसेक पाण्याची आवक झाली असून पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे. दिवसभरात कोयनेला – 16 मिलीमीटर, नवजा- 25 मिलीमीटर व महाबळेश्वरला – 20 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला – 3 हजार 89, नवजा – 4 हजार 401 आणि महाबळेश्वरला – 4 हजार 62 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणातील पाण्याची पातळी हि 2142′ 03″ (652.958m) इतकी झाली आहे.
कोयना धरणात किती पाणी याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खालील आकडेवारी पहा –
Koyna Dam
Date : 05/08/2023
Time : 05:00 PM
Water level : 2142′ 03″ (652.958m)
Dam Storage
Gross : 80.97 TMC (76.93%)
Inflow : 12,447 cusecs
Discharges
KDPH : 2100 Cusecs.
Total Discharge in koyna River : 2100 Cusecs
Rainfall in mm : (Daily/Cumulative)
Koyna : 16/3089
Navaja : 25/4401
Mahabaleshwar : 20/4062