कोयना धरणाचा पाणीसाठा झाला 82.16 TMC; पावसाचा जोर ओसरला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा वाढला जोर कमी झाला असल्यामुळे धरण क्षेत्रांत पाण्याचाही आवक कमी झाली आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणाचा एकूण पाणीसाठा 82.16 टीएमसी झाला असून, सुमारे 78.06 टक्के धरण भरले आहे.

कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. गेल्या सहा दिवसांपासून कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असल्यामुळे धरणात होणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. धरण क्षेत्रात रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 82.16 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तसेच गेल्या 24 तासात कोयनेला – 12 मिलीमीटर, नवजा – 13 मिलीमीटर व महाबळेश्वरला – 10 मिलीमीटर पाऊस पडला.

त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या पावसापैकी कोयनेला – 3 हजार 112, नवजा – 4 हजार 420 आणि महाबळेश्वरला – 4 हजार 77 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयना धरणातून 2100 क्युसेस इतक्या क्षमतेने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. कोयना धरणात 9 हजार 860 क्युसेस इतक्या क्षमतेने पाण्याची आवक होत असल्याने धरणाची पाणी पातळी 2143′ 07″ (653.364m) इतकी झाली आहे.

कोयना धरणात किती पाणी याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खालील आकडेवारी पहा –

Koyna Dam
Date : 07/08/2023
Time : 08:00 AM
Water level : 2143′ 07″ (653.364m)

Dam Storage :
Gross : 82.16 TMC (78.06%)

Inflow : 9,860 cusecs

Discharges
KDPH : 2100 Cusecs.
Total Discharge in koyna River : 2100 Cusecs

Rainfall in mm : (Daily/Cumulative)
Koyna: 12/3112
Navaja: 13/4420
Mahabaleshwar: 10/4077

कराड – पाटण तालुक्यातील महत्वाच्या पुल परिसरातील पाणी पातळी पहा

Dated 7/08/2023
Saturday – Monday
Time : 7:00 am

1) कोयना जुना पूल कराड –
पाणी पातळी – 555.181(17’00”) (इशारा – 45ʼ) (धोका – 58ʼ4ʼʼ)
2) वारुंजी –
पाणी पातळी – 554.067 (15’02”) विसर्ग 8468क्युसेक (इशारा – 43’10”)(धोका – 51ʼ8″)
3) हेळवाक पुल
पाणी पातळी – 574.20 m. (ईशारा 576.80 m.) (धाेका 578.60 m.)
4) केरा पुल पाटण –
पाणी पातळी 567.00 m. (ईशारा 570.45 m.) (धाेका 572.97 m.)