कोयना धरणातील पाणीसाठ्याने केली सत्तरीपार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

0
335
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. धरणांतर्गत विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या सरासरी प्रतिसेकंद 19,181 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरण पायथ्याशी असलेल्या पायथा वीजगृहातील दोन्ही जनित्रांद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2100 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येत असून . सध्या कोयना धरणात एकूण 70.51 टीएमसी उपलब्ध तर 65.51 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.

105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाला पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे 34.74 टीएमसी पाण्याची गरज आहे. सध्या कोयना धरणात एकूण 70.51 टीएमसी उपलब्ध तर 65.51 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. दरम्यान, विभागात पावसाचा जोर वाढला असून पाऊस असाच राहिला तर पुढील काही दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरेल, असा अंदाज आहे.

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी, मोरणा, हातगेघर, उत्तरमांड, वांग- मराठवाडी हे प्रकल्प भरून वाहिले असून कोयना, कण्हेर, उरमोडी धरणातून पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी जलविसर्ग सुरू आहे. गेल्या दीड- पावणेदोन महिन्यातील वळीव आणि त्यानंतरच्या मोसमी पावसाने जलाशयात तुलनेत उच्चांकी जलसाठा झाला आहे.