पाटण प्रतिनिधी । निवडणूक विभागाच्या वतीने मतदान जागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. दरम्यान, प्रशासनाच्या मतदान जागृतीमध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला आहे. पाटण तालुक्यातील विहे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे गावामध्ये जनजागृती केली.
“चला जावूया मतदान करायला, मतदानाचा हक्क बजवा मात्रभूमीच शान वाढावा”, 18 वर्षावरील तरुण, वयोवृद्धांनी येत्या 20 नोव्हेंबरला घराच्या बाहेर पडून मतदान करण्याचे आवानही विहे येथील जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे ग्रामस्थांना आवाहन केले.
देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे असर आवाहन देखील विद्यार्थ्यांनी यावेळी केले.