सातारा जिल्ह्यात पूर ओसरला; कोयना धरणामध्ये झाला ‘इतका’ TMC पाणीसाठा

0
17
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८:१५ वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ३ फुटांवरून १ फुटापर्यंत खाली आणून ७,९०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला आहे.

कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण १०,००० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

गुरुवारी सायंकाळपर्यंत पावसामुळे २८ घरे आणि ८५ दुकानांना फटका बसला आहे. तरीही, पंचनाम्याचे काम सुरू असल्याने नुकसानीचा आकडा वाढणार आहे. जिल्ह्यात चार दिवस पाऊस पडला. विशेषत: पश्चिम घाट आणि सातारा, पाटण, जावळी, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टी झाली. पश्चिमेकडील प्रमुख सहा धरण पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाला. यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करावा लागला. परिणामी अनेक पूल आणि रस्तेही पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली होती.

मात्र, बुधवारी दुपारपासून पाऊस कमी झाला. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे २४, नवजाला २५, तर महाबळेश्वरला २० मिलिमीटर पाऊस झाला.

Koyna Dam
Date: 22/08/2025, 08:00 AM
Water level: 2158’06”
(657.911)

Gross Storage : 98.78 TMC (93.85%)
UGC: 94.41 TMC
LGC: 90.03 TMC

Inflow : 28,557 Cusecs.
(2.46 TMC)

Discharges-
KDPH : 2100 Cusecs.
Radial Gate: 19,800 Cusecs.
Total Discharge: 21,900 Cusecs.

*Rainfall in mm-
(Daily/Cumulative)
Koyna- 24/4021
Navaja- 25/4925
Mahabaleshwar- 20/4653