पाटण तालुक्यात तब्बल ‘इतक्या’ मतदारांनी केले ‘टपाली’ मतदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | भारतीय निवडणूक आयोगाकडून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी ‘घरातून मतदान’ या विशेष उपक्रमाद्वारे या योजनेचा लाभ घेवून मतदान केले. वृद्ध व दिव्यांग व्यक्तींनी लोकसभा निवडणुकीत टपाली मतदानाला उत्तम प्रतिसाद दिला. या दोन्ही प्रवर्गाच्या 138 मतदारांनी मतदान करुन मतदानाची प्रक्रिया घरपोच मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले.

पाटण विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी 224 ज्येष्ठ नागरिक व 53 दिव्यांग असे एकूण 277 मतदार आहेत. यातील 138 मतदारांनी या प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदान केले.

ही प्रक्रिया सुलभ व विनासायास होण्यासाठी निवडणुक आयोगाचे कर्मचारी मेहनत घेताना दिसत आहेत. निवडणूक निर्णय आधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, सहायक निवडणुक आधिकारी प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार अनंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र अध्यक्ष, सहायक मतदान आधिकारी, पोलीस कर्मचारी, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, कोतवाल हे परीश्रम घेत आहेत.