आ. बाळासाहेब पाटील कराडातच! ‘या’ वेळी करणार भूमिका स्पष्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । संतोष गुरव

महाराष्ट्राच्या राजकारणात पुनः एकदा मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 30 आमदार सोबत गेले आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब पाटील हे कराडमध्येच असून ते 4 वाजता आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

आज सकाळी अजितदादांच्या देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या काही आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. तसेच 30 आमदरांसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या एकूण ९ मंत्र्यांनी शपथ घेटली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप आणि शिंदे गटाचे सर्व नेतेमंडळी राजभवनावर उपस्थित

अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 54 आमदारांपैकी 30 आमदारांचे पाठबळ आहे. यामध्ये दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अमोल मिटकरी, अतुल बेनके, रामराजे निंबाळकर, मकरंद पाटील यांच्यासह अनेक आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडला आहे.