कोयना धरणातील विसर्ग आणखी कमी होणार, तूर्तास पुराचा धोका टळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याची आवकही घटली आहे. त्यामुळे सायंकाळी ५ वाजता धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. रात्री ८ वाजता विसर्ग आणखी कमी केला जाणार आहे.

सोमवारी सायंकाळी ४ वाजता कोयना धरणात ८६.११ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या सांडव्यावरून ४०,००० क्युसेक्स आणि पायथा विद्युत गृहातून २१०० असा एकूण ४२,१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता. मात्र, पावसाचा जोर आणि आवक कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आला आहे.

सोमवारी सायंकाळी ५ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ६ फुटांवर आणण्यात आले आहेत. सांडव्यावरून ३०,००० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सायंकाळी ८ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे ४ फूट करून सांडव्यावरील विसर्ग २०,००० क्युसेक्स इतका कमी करण्यात येणार आहे.