पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरु असून आज, सकाळी मिळालेल्या माहितीनुसार गत चोवीस तासात पडलेल्या पावसामुळे धरणात 15.23 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, काल पाणलोट क्षेत्रांत पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा जोर आहे. गेल्या चोवीस तासात महाबळेश्वर येथे 75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजा येथे 05 मिलीमीटर आणि कोयनानगर येथे 05 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणातील पाणीपातळी 2043 फूट झाली आहे.
एक जूनपासून जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद नवजाला १९७ मिलीमीटर झाली. तर कोयना येथे १६६ मिलीमीटर पाऊस झालेला आहे. महाबळेश्वरचा पाऊस ९६ मिलीमीटर पर्यंत पोहोचला आहे. सातारा जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस १० जूननंतर दाखल झाला. त्यानंतरही पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे पेरण्यांना उशीर झाला होता. यंदा मात्र, मान्सून वेळेवर दाखल झाला आहे.
कोयना धरणात किती पाणी याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खालील आकडेवारी पहा –
Koyna Dam
Date : 12/06/2024
Time : 08:00 AM
Water level : 2043”00” (622.706m)
Dam Storage :
Gross : 15.23 TMC (14.47%)
Live : 10.11 TMC (10.09%)
Discharges
KDPH : 00 Cusecs.
Total Discharge in koyna River : 00 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna – 05/171
Navaja – 05/202
Mahabaleshwar – 75/171