दुष्काळी परिस्थितीमुळे कोयना धरणाच्या वीजनिर्मितीवर आल्या मर्यादा; ‘इतकी’ केली जातेय वीजनिर्मिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले होते तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस कमी राहिला. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ९५ टीएमसीच्या उंबरठ्यावरच पोहोचला होता. परिणामी, सातारा, सांगली जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. २ हजार मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता असलेल्या या प्रकल्पातून सध्या ६०० मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती सुरू आहे.

कोयना धरणातून मागील तीन महिन्यांत सिंचनासाठी वारंवार पाणी सोडण्यात आले आहे. मागील महिन्यात तर सांगलीच्या पाटबंधारे विभागाकडून सिंचन मागणीत वाढ झाली. त्यामुळे कोयना धरणाच्या आपत्कालीन द्वारमधूनही एक हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला.

या कारणाने पायथा वीजगृह आणि आपत्कालीन द्वार असे दोन्हीकडील मिळून ३१०० क्युसेक पाणी विसर्ग सुरू होता; मात्र आता धरणाचे आपत्कालीन द्वार बंद केले आहे. यामुळे सध्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू आहेत. त्यातूनच २१०० क्युसेक वेगाने पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे.