सातारा प्रतिनिधी । अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरुन करंजोशीतील एका युवकाच्या शरीरावर गंभीर मारहाण करुन त्याचा खून केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे रविवारी सायंकाळी घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी घटनेचा गुन्हा चार तासांच्या आतमध्ये उघडकीस आणला आहे. या खून प्रकरणातील एका विधी संघर्षग्रस्त बालकासह आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये सहा कराड तालुक्यातील, एक पाटण तर एक सातारा तालुक्यातील आहे.
१)ओंकार हणमंत पन्हाळकर (वय २०, रा. करंजोशी ता. कराड जि.सातारा), २) निखील रमेश पन्हाळकर (वय २२, रा. करंजोशी ता. कराड जि. सातारा), ३) रोहित सारुती पवार वय २१, रा. करंजोशी ता.कराड जि. सातारा), ४) आदित्य नामदेव पवार वय १८, रा. गडकरआळी सातारा), ५) साहिल जयसिंग पिंपळे वय १९, रा. मालोशी ता. पाटण जि.सातारा), ६) तेजस सचिन पन्हाळकर वय २१, रा. करंजोशी ता. कराड जि. सातारा), ७) कुमार एकनाथ पन्हाळकर वय २२, रा. करंजोशी ता. कराड जि.सातारा), ८) देवेंद्र बनाजी घाडगे वय २८, रा. करंजोशी ता. कराड जि. सातारा) ९) विधी संघर्षग्रस्त बालक अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. १६/०६/२०२४ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान नागठाणे येथे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन रोहिदास मारुती पन्हाळकर या २१ वर्षीय तरुणाच्या शरीरावर गंभीर मारहाण करुन त्याचा खून केल्याची फिर्यादीने तक्रार दिली होती. त्यानंतर बोरगांव पोलीस ठाणे गुरनं २९४/२०२४ भादंवि कलम ३०२ प्रमाणे दिनांक १७/६/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा खूनाचा असल्याने पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे अरुण देवकर यांच्या अधिपत्त्याखाली सपोनि पृथ्वीराज ताटे व सुधीर पाटील यांचे एक पथक तयार करुन तपासकामी बोरगांव पोलीस ठाण्यास पाठविण्यात आले होते.
सदर पथकाने नागठाणे येथे जाऊन गुन्हयाच्या घटनास्थळास भेट दिली. तसेच तेथील परिस्थितीची माहिती घेत पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे बोरगांव पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांचे समवेत तपास केला असता रोहिदास पन्हाळकर दोन इसमांनी सिव्हील हॉस्पिटल सातारा येथे उपचाराकरीता दाखल केले असल्याची माहिती मिळाली. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नमुद दोन इसमांची चौकशी केली असता त्यांनी सांगितलेल्या हकिकतीमध्ये व गुन्हा घडलेच्या परिस्थितीमध्ये तफावत आढळूनआली. पोलीस चौकशीत दोन इसम व त्यांचे इतर ७ साथीदार यांनी मिळून सदर खूनाचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले. सदरचा खून छेडछाडीच्या संशयावरुन केला असल्याची माहिती पथकास मिळाल. अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेकडील व बोरगांव पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर खूनाचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यापासून ४ तासाचे आत उघड केला आहे.
सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने पोलीस अंमलदार सुधीर बनकर, विजय कांबळे, संजय शिर्के, अतिष घाडगे, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, मंगेश महाडीक, लक्ष्मण जगधने, मनोज जाधव, अमित माने, अरुण पाटील, सनी आवटे, अमित झेंडे, राजु कांबळे, अजय जाधव, रोहित निकम, धीरज महाडीक, प्रविण कांबळे, स्वप्निल दौंड, प्रविण पवार, स्वप्निल कुंभार, पृथ्वीराज जाधव, मोहन पवार, वैभव सावंत, विक्रम पिसाळ, बोरगांव पोलीस ठाण्याचे सपोनि रविंद्र तेलतुंबडे, पोउनि निकम, पोलीस अंमलदार अमोल सपकाळ, दादा स्वामी, विजय म्हेत्रे, विशाल जाधव, बाळासाहेब जानकर यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.