सातारा प्रतिनिधी । फलटण तालुक्यातील कापडगाव गावचे हद्दीतील शासकीय गोदामातील धान्य चोरी झालेबाबत लोणंद पोलीस ठाणेत गुन्हा दाखल झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी एक आरोपीचा ठावठिकाणा मिळताच त्यास ताब्यात घेतले. तीन साथीदारांनी मिळून गोदामातील धान्याची १० पोती व वजने चोरी केलेची कबुली दिली.
दत्तात्रय मारुती सरक (वय २८, रा. पाडेगाव ता. फलटण जि. सातारा), वैभव गोपाळ गोवेकर (वय २२, रा. कोरगाव ता. फलटण जि. सातारा), अजिंक्य उर्फ परश्या अरुण जाधव (वय १९, रा. कोरेगाव ता. फलटण जि.सातारा, एक विधीसंघर्ष बालक अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी दत्तात्रय मारुती सरक, वैभव गोपाळ गोवेकर, अजिंक्य उर्फ परश्या अरुण जाधव व एक विधिसंघर्ष बालक यांना तपास करून ताब्यात घेतले. चोरुन नेलेला मुदेमाल व गुन्हा करतेवेळी वापरलेल्या दोन मोटर सायकली चोरून नेल्याची त्यांनी कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून संबंधित साहित्य व मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली सुशील भोसले, सर्जेराव सुळ नाळे, विजय पिसाळ, नितीन भोसले, विट्ठल काळे, केतन लाळगे, गोविद आंधळे, अंकुश अभिजीत घनवट, संजय चव्हाण तसेच होमगार्ड सचिन निकम, रब्बानी शेख, हेमंत कारंडे, रवी यांनी कारवाईत भाग घेतला.