शहराच्या मध्यवर्ती भागात चालायचा गाड्यांमध्ये गॅस भरण्याचा गोरख धंदा; पोलीस, महसूल विभागाने छापा मारून केला पर्दाफाश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या छुप्या पद्धतीने घरगुती गॅस रिक्षात भरण्याचा प्रकार सुरु होता. दरम्यान, या छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या अवैध धंद्याबाबत पोलीस व महसूल विभागास माहिती मिळाली. त्यानंतर येथील शनिवार पेठेतील चर्चनजीकच्या कासमभाई बोर्डिंगमधील एका खोलीत घरगुती गॅस बेकायदेशीरपणे रिक्षात भरण्याचा प्रकार सुरू असताना पोलिसांनी त्या ठिकाणी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. यावेळी टाकलेल्या छाप्यात त्यांनी 18 सिलेंडर, 2 मोटारी, 2 रिक्षासह सिलेंडर पोच करणारे वाहन जप्त केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरातील शनिवार पेठेतील चर्चनजीकच्या मोकळ्या जागेत छुप्या पद्धतीने घरगुती गॅस रिक्षात भरला जात असल्याची माहिती पोलीस व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली. यानंतर त्यांनी मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे त्यांनी आदल्या दिवशी कारवाईचे नियोजन केले.

त्यानुसार पहाटे साधारण पाच वाजण्याच्या सुमारास आयएएस अधिकारी डी. एन. चंद्रा, पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी, पोलिसांनी चर्चजवळ सापळा रचला. योग्य वेळ पाहून सर्व अधिकारी, पोलिसांनी संबंधित ठिकाणावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी एक गॅस वाहतूक करणारे वाहन यासह १८ सिलेंडर, २ मोटारी गॅसच्या टाक्या ताब्यात घेतल्या.