सातारा प्रतिनिधी | शालेय, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थिनींना छेडछाडीपासून संरक्षण देण्यासाठी निर्भया पथकांची दमदार कामगिरी सुरू आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण व पुणे ग्रामीण विभागांचा समावेश आहे. सातारा जिल्हा निर्भया पथकाने दोन वर्षांत परिक्षेत्रातील सर्वाधिक २२ हजार ९३३ जणांचे समुपदेशन केले, तर ५७ रोडरोमिओंवर गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान, उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी व महिला पोलिसांचे स्वतंत्र पथकांकडून रोडरोमिओंवर लक्ष ठेवण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेड काढण्याचा प्रकार होऊ नये यासाठी साध्या वेशातील महिला पोलिस कर्तव्य बजावत रोडरोमिओंना धडा शिकवत आहेत.
शाळांमध्येच मागील दोन वर्षांत ३५ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींचे समुपदेशन निर्भया पथकांकडून करण्यात आले, तर १४७ संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले.