पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यात डोंगराळ भागात बिबट्याचा मुक्तपणे वावर सध्या वाढलेला आहे. दरम्यान, पाटण तालुक्यातील सोनाईचीवाडी येथील एका शेतकऱ्यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने शेळी व बोकड ठार केल्याची घटना घडली. इतकेच नाही तर सोनाईचीवाडी येथे रात्री दोन अडीच वाजण्याच्या सुमारास सुरेश सखाराम अपशिंगे यांच्या जनावराच्या गोठ्यात घुसून बिबट्याने एका शेळीला ठार केले. सोबत असलेल्या बोकडाला फरफटत फडशा पाडला.
बिबट्याचा वावर असल्याने शाइतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सोनाईचीवाडी या ठिकाणी घटना घडल्यानंतर याची माहिती तत्काळ शेतकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यानं दिली. त्यानंतर वनरक्षक मेघराज नवले यांच्याकडून नुकसान भरपाईचा पंचनामा प्रस्ताव तयार करून वरिष्ठ विभागाकडे पाठवण्यात आला.
यापूर्वी काही दिवसात लालासो कुंडलिक मुळीक यांच्या घरासमोरून एकापाठोपाठ एक अशी चार पाळीव कुत्री फरफटत नेली. दोन दिवसांपूर्वी नावडी येथील दादासो मस्के यांची शेळीच्या कळपातून बोकड फस्त केला. तर खिलारवाडी येथील अंकुश लक्ष्मण माने यांची एक शेळी, मायआप्पा हधीमुनी यांच्या एक शेळीवर हल्ला करून फडशा पडला आहे.