पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगलाच वाढत असून रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत नवजा येथे 55 मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे 73 आणि महाबळेश्वरला 54 मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात यावर्षी प्रथमच आवक सुरू झाली आहे. मागील 20 दिवसांपासून पाऊस पडत आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान, कोयना धरणात सध्या 19.01 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळासह पाटण तालुका आणि कांदाटी खोऱ्यात पाऊस सुरू झाल्याने धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाने लावलेल्या हजेरीमुळे भुईमुगासह सोयाबीन आदी बियाणांची ठिकाणची पेरणीची कामे शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे पडलेला आहे. तसेच पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी भागातही दमदार हजेरी लागली आहे. त्यामुळे ओढ्यांना पाणी वाहिले. तसेच बंधाऱ्यातही पाणीसाठा झाला आहे. दि. 1 जूनपासून कोयनेला ६९८ आणि महाबळेश्वर मध्ये ६५४ मिलीमीटर पाऊस पडला आहे.
Koyna Dam
Date : 30/06/2024
Time : 08:00 AM
Water level : 2053”00” (625.754m)
Dam Storage :
Gross : 19.01 TMC (18.06%)
Live: 13.89 TMC (13.87%)
Inflow : 8648 Cusecs.
Discharges
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge : in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm – (Daily/Cumulative)
Koyna- 73/771
Navaja- 55/975
Mahabaleshwar- 54/708