कोयना धरणात ‘इतका’ TMC झाला पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस होत असून २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळला असून रविवारी सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार नवजा येथे 127 तर कोयनानगरला 107 मिलीमीटरची नोंद झाली. तसेच महाबळेश्वर तालुक्यातही जोरदार पाऊस होत या ठिकाणी सर्वाधिक 158 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली असून धरणात सध्या 54.42 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तसेच जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणक्षेत्रातही पाऊस सुरू आहे.

पाटण, जावळी, महाबळेश्वर आणि सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत असून कोयना धारण पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळी पावसाने चांगली हजेरी लावली आहे. यामुळे रानावनातून पाणी खळाळून वाहू लागले आहे. त्याचबरोबर धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी धरणक्षेत्राही पाऊस सुरू असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

जिल्ह्यात दोन दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत असून कृष्णा, कोयना नदीच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. तर जूनपासून आतापर्यंत नवजाला 2 हजार 847 मिलमीटर पर्जन्यमान झाले. यामुळे नवजाच्या पावसाची तीन हजार मिलीमीटरकडे वाटचाल सुरू झाली आहे. कोयना येथे आतापर्यंत 2 हजार 393 मिलीमीटर पाऊस झाला. महाबळेश्वरलाही २४ तासांत 158 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर आतापर्यंत 2 हजार 259 मिलीमीटर पाऊस पडला आहे. रविवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात सुमारे 42 हजार 279 क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात 54.42 टीएमसी पाणीसाठा झालेला. त्यामुळे कोयना धरण अर्धे भरले आहे.

Koyna Dam

Date : 21/07/2024
Time : 08:00 AM
Water level : 2112’03” (643.814m)

Dam Storage :
Gross : 54.42 TMC (51.71%)
Live : 49.30 TMC (49.23%)

Inflow : 42,279 Cusecs.

Discharges
KDPH : 00 Cusecs.
Total Discharge in koyna River : 00 Cusecs

Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna – 107/2393
Navaja – 127/2847
Mahabaleshwar – 158/2259