रात्रीच्यावेळी ‘त्यांनी’ छऱ्याच्या बंदुकीतून झाडल्या गोळ्या; पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील गमेवाडी व वागजाईवाडी याठिकाणी रात्रीच्यावेळी अज्ञातांनी छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली असून यामध्ये एक कुत्रा जागीच ठार झाला असून दोन कुत्री जखमी झाली आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, चाफळ विभागातील वागजाईवाडी येथील ओंकार संजय महिपाल यांच्या मालकीचे पाळीव कुत्रे रात्रीचे वेळी घराबाहेर बसले होते. शुक्रवारी रात्री एका ओमनी गाडीतून अज्ञात शिकारी त्यांच्या घरासमोर आले. त्यांनी रस्त्यावर उभे असलेल्या पाळीव कुत्र्यावर छऱ्याच्या बंदुकीतून अचानक गोळी करण्यास सुरुवात केली. यामध्ये ओंकार यांची दोन कुत्री गंभीर जखमी झाली. तेथून पुढे जात अज्ञातांनी गमेवाडी गमेवाडी येथील संतोष तिकुडे यांच्या कुत्रावर गोळीबार केला. यामध्ये तिकुडे यांचे कुत्रे जागीच ठार झाले.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. तसेच तर मृत कुत्र्याचा वैद्यकीय पंचनामा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल घाडगे यांनी केला आहे. चाफळ विभागात प्रथमच असा प्रकार घडल्याने परिसरात रात्रीच्यावेळी शिकारी राजरोसपणे फिरत असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.