कोयना धरणाचे दरवाजे 4 फुटांनी उघडले, 40 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पाऊस होत आहे. जूनमध्ये चांगला पाऊस झाला. तर जुलैमध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे पश्चिम भागातील तळ गाठलेल्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. सर्वच धरणे ८० टक्क्यांवर भरली. पूर्व भागात मागील वर्षभर दुष्काळ होता. सततच्या पावसामुळे तलाव आणि धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढत असल्यामुळे आज दि. ५ सप्टेंबर २४ रोजी सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ४ फुटांपर्यंत उघडून ३७,५२७ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे.

धरण पायथा विद्युत गृहामधून २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून नदीपात्रात एकूण ३९,६२७ क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

Koyna Dam

Date: 05/09/2024
Time: 08:00 AM
Water level: 2163’06” (659.435m)

Dam Storage:
Gross: 105.25 TMC (100.00%)
Live: 100.13 TMC (100.00%)

Inflow : 25,540 Cusecs.

Discharges
Radial Gate: 28,396 Cusecs.
KDPH: 2,100 Cusecs.

Total Discharge in koyna River: 30,496 Cusecs

Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 43/5119
Navaja- 97/6092
Mahabaleshwar- 73/5847