कोयना धरणाचे दरवाजे बंद, वीजगृहातून विसर्ग कायम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | पाणलोट क्षेत्रामधील पाऊस कमी झाल्यामुळे धरणामध्ये येणारी आवक कमी झाली आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ८:०० वा. धरणाचे ६ वक्र दरवाजे बंद करून सांडव्यावरील विसर्ग बंद करण्यात आला आहे.

धरण पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक्स विसर्ग कोयना नदीमध्ये सोडण्यात येत आहे. कोयना नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन धरण व्यवस्थापनाने केले आहे.

Koyna Dam
Date: 31/08/2024
Time: 08:00 AM
Water level: 2162’02” (659.028m)

Dam Storage:
Gross: 103.52 TMC (98.36%)
Live: 98.40 TMC (98.27%)

Inflow : 10,721 Cusecs.

Discharges
Radial Gate: 00 Cusecs.
KDPH: 2,100 Cusecs.

Total Discharge in koyna River: 2100 Cusecs

Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 13/4976
Navaja- 09/5840
Mahabaleshwar- 02/5649